कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्लॅक लिस्ट होण्याच्या भीतीने पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर घेतला आहे. मात्र कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्याऐवजी पाकिस्तानी वकील देऊन धूळफेक करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. ते कोल्हापूरात बोलत होते. दरम्यान, कुलभूषण जाधव यांना पकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली असून, त्यांच्या माफी अर्जाबाबत पाकिस्तानने आंतराष्ट्रीय पातळीवर ब्लॅक लिस्ट होऊ नये, यासाठी बदल केल्याची माहितीही त्यांनी दिली.
कंगना राणावत यांनी केलेल्या विविध वक्तव्यावर न्यायालयाने अप्रत्यक्षपणे नापसंती व्यक्त केली आहे. कंगणाने मुंबई पोलिसांबद्दल केलेली वक्तव्य आणि मुंबई शहराची पीओकेशी केलेली तुलना हे सभ्यतेचे लक्षण नसल्याची टीकाही त्यानी केली आहे़ एकूणच या प्रकरणावर बोलताना अनियंत्रित वक्तव्य करणा-यांवर निर्बंध घालण्याची गरज व्यक्त केली आहे.
ईडीच्या कारवाईत कोणी दोषी नसेल तर त्याची निर्दोष मुक्तता होईल. मात्र एखाद्या व्यक्तिविरोधात कारवाई झाली म्हणून त्याला राजकीय स्वरूप देऊन तपास यंत्रणांना बदनाम करू नका, असे आवाहन ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी केलंय. असे झाले तर तपास यंत्रणेकडे बघण्याचा लोकांना दृष्टिकोन बदलून आशा संस्थांची विश्वासाहर्ता धोक्यात येऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील गुंतवणूक, चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपच्या कुटील डाव!