मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना उत्तर तालिकेवरील हरकती ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरीता रुपये १००/- प्रती हरकत(प्रश्न) + रुपये ४४/- इतके शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माहितीपत्रकानुसार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परिक्षांकरता प्रथम उत्तरतालिकेवर हरकत नोंदवण्याची सोय करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे आणि त्यासाठी आयोगाकडून एका प्रश्नाकरत १०० रूपये आणि अतिरिक्त ४४ रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. जेवढे प्रश्न असतील त्या पटीने शुल्क द्यावे लागणार आहे. अतिरिक्त प्रत्येक प्रश्नासाठी उमेदवाराला १०० रूपये द्यावे लागणार आहेत.
आयोगाच्या या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून म्हणजे १ जुलै २०२२ पासून लागू करण्यात येणार असल्याचे आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे आता अनावश्यक हरकतींना आळा बसणार आहे.