32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रदहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

एकमत ऑनलाईन

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी जाहीर करण्यात आलेले संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आले आहे. एप्रिल-मेमध्येच या परीक्षा होणार आहेत. पुणे, नागपूर, औंरगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागांत दहावी, बारावीच्या परीक्षा एकाच वेळी सुरु होणार आहेत. याबाबतचे संभाव्य वेळापत्रक १६ फेब्रुवारीला मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यावर संघटना, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याचा विचार करुन संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आले आहे.

राज्य शिक्षण मंडळाने दोन आठवडय़ांपूर्वी दहावी बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकाची माहिती मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांच्या काही सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज हे वेळापत्रक अंतिम करण्यात आले असून यामध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली. तसेच व्हॉट्सअॅप किंवा अन्य माध्यमातून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही पाटील यांनी केले.

दहावीच्या लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहेत. बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी विषयाच्या तसेच पुनर्रचित व जून्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे. परीक्षेपूर्वी राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याची माहिती सविस्तरपणे दिली जाईल असेही मंडळाकडून सांगण्यात आले. शिक्षण मंडळाकडून आज जाहीर करण्यात आलेले दहावी बारावीचे वेळापत्रक हे मंडळाच्या अधिपृत  www.mahahsscboard.in वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे.

६ महिन्यांच्या तीरा कामतला अखेर मिळालं १६ कोटींचं औषध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या