27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रअखेर पुरुष आणि महिला कीर्तनकाराविरोधात गुन्हा दाखल

अखेर पुरुष आणि महिला कीर्तनकाराविरोधात गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील एका पुरुष आणि महिला कीर्तनकाराचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका महिला आणि पुरुष कीर्तनकाराचा शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पुरुष कीर्तनकार आणि महिला कीर्तनकार यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. अखेर वैजापूरच्या त्या कीर्तनकारासह महिलेविरोधातही धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर माणिकराव खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून पुरुष कीर्तनकार याच्यासह त्या समव्यावसायिक महिलेवर शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेली अनेक वर्षे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील ४८ वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील ४० वर्षीय महिला कीर्तनकार या अश्लील व्हिडिओ क्लिपमध्ये नको त्या अवस्थेमध्ये दिसून आलेत. चित्रफितीमध्ये दिसत असलेल्या महाराजांना एक मुलगा देखील आहे. सदरील व्हिडिओ हा महाराजांनी चित्रित केल्याचंही या चित्रफितीमध्ये पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे दोन व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

सदरील व्हिडीओ क्लिप मध्ये दिसणारी महिला ही देखील महाराज आहे. या दोघांचाही मोठा भक्त परिवार आहे. तर दोघांचे यू ट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला आहे.

महिला कीर्तनकारानं घेतले विष
सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आपली बदनामी होत असल्याचं लक्षात येताच सदरील महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सदरील महिला वर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे पुरुष कीर्तनकारानंही काही टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून महाराजांवर त्यांचे नातेवाईक लक्ष ठेवून आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या