25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रसांगली कृउबा समितीत हळदीची जीएसटी करातून अखेर मुक्तता   

सांगली कृउबा समितीत हळदीची जीएसटी करातून अखेर मुक्तता   

एकमत ऑनलाईन

सांगली : सांगलीच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या हळदीस जीएसटी करातून अखेर मुक्तता मिळाली आहे. महाराष्ट्र निर्णय प्राधिकरण मुंबई यांनी जीएसटी हा हळद या शेतीमालावर लागणार नाही, असा निर्णय दिला आहे. यामागे सांगली बाजार आवारामध्ये शेतकरी हा स्वत: हळद विक्रीसाठी घेऊन येत असतो असे कारण देण्यात आले आहे. तसेच येथून पुढे हळद हा शेतीमाल म्हणून ग्रा धरला जाणार आहे. त्यामुळे सांगली बाजारपेठेत हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे.

पाच टक्के कर मागे घेतला
२०१७ पासून हळदीच्या खरेदीवर पाच टक्के जीएसटी कर लागू करण्यात आला होता. अखंड स्वरूपात असलेली हळद हा शेतीमाल असल्याचे लवादाने मान्य करून हळदीवर लावण्यात आलेला पाच टक्के कर मागे घेतला. मात्र, हळदीवर पुढील प्रक्रिया म्हणजे पूड असेल तर मात्र कर लागू राहणार आहे. सांगली बाजारपेठ हळदीची देशातील मुख्य बाजारपेठ असून वार्षिक हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र हळदीच्या खरेदीवर पाच टक्के जीएसटी कर २०१७ पासून लागू करण्यात आला होता. हळद हा शेतीमाल प्रक्रियाविरहित असल्याने कर लागू होत नसल्याचे अडत व्यापा-यांचे म्हणणे होते.

खरेदीदारांना मोठा दिलासा
कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांनी जीएसटी का रद्द करावी? याबाबतची आपली भूमिका मांडली होती. मात्र हळद हा शेतीमाल असल्याचे आता लवादाने मान्य केले आहे. या निर्णयामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी हळदीचे अडत व्यापारी मेसर्स एन. बी पाटील पेढीने लवादाकडे अपील केले होते. यामुळे आता सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचा व्यवहार करणा-या कमिशन एजंटवर आता जीएसटी लागणार नाही.

हजार कोटींहून अधिक उलाढाल
सांगलीची हळद बाजारपेठ महत्त्वाची असून वार्षिक हजार कोटींहून अधिक उलाढाल होते. बाजारातील हळद सौदे करमुक्त करण्याच्या लवादाच्या निर्णयामुळे सांगली बाजारला आणखी उभारी मिळेल अशी आशा आहे. केंद्रीय करनिर्धारक सदस्य अशोककुमार मेहता आणि राज्य करनिर्धारक सदस्य राजीव कुमार मित्तल यांच्यासमोर जीएसटी कर आकारणीबाबत सुनावणी झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या