33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र अखेर महापोर्टल रद्द

अखेर महापोर्टल रद्द

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांच्या मनात आशेचा किरण दिसला असून, राज्य सरकारने वादग्रस्त महापोर्टलऐवजी चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करणार असल्याची घोषणा आज राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्विटरव्दारे केली. राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील ८५०० आणि पोलिस विभागातील पाच हजार २९७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे महापोर्टलच्या माध्यमातून होणाºया नोकर भरतीला अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारने महापोर्टल रद्द करुन राज्य सरकारने चार कंपन्यांची निवड केली आहे.

या कंपन्या आता भरती प्रक्रिया करणार आहेत. निवडण्यात आलेल्या चार कंपन्यांद्वारे इथून पुढे पदभरती प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. लवकरच याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे.

काय म्हणतो शासन निर्णय?
महापरीक्षा पोर्टल अतंर्गत येणाºया परीक्षा पद्धतीत बदल करुन सुधारित परीक्षा पद्धतीनुसार सर्व्हिस प्रोवायडरची निवड करण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई (महा आयटी) यांच्याकडे देण्यात आली होती. त्या विभागानं निवड करुन सादर केलेल्या माहितीनुसार ४ कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

ह्या आहेत त्या कंपन्या
१. मेसर्स अ‍ॅपटेक लिमिटेड
२. मेसर्स जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रयाव्हेट लिमिटेड
३. मेसर्स जींजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड
४. मेसर्स मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड

पाच वर्षांसाठी कंपन्यांना परवानगी
या चार कंपन्यांना महाराष्ट्रातील आगामी पाच वर्षांतील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील शासकीय विभाग, एमएपीएसीच्या कार्यकक्षेबाहेरील गट ब आणि गट क च्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

भारत-पाक सीमेवर पुन्हा बोगदा आढळला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या