30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रअखेर नाथाभाऊ राष्ट्रवादीत; जयंत पाटील यांनी केली घोषणा

अखेर नाथाभाऊ राष्ट्रवादीत; जयंत पाटील यांनी केली घोषणा

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र भाजपाला उत्तर महाराष्ट्रात मोठा हादरा बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. मागील काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चेनं वेग घेतला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्तांवर शिक्कामोर्तब केले. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दलची माहिती दिली.

भाजपची ख-या अर्थाने वाढ करणारे एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडल्याचे मला सांगितले. त्यामुळे त्यांनी भाजपाचा त्याग केला आहे. खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. भाजपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे, असे पाटील यांनी सांगितले.

खडसे यांच्याबरोबर ब-याच जणांची यायची इच्छा आहे. पण कोरोनाकाळात विधानसभेच्या निवडणूक घेणे परवडणार नाही. पण खडसे यांच्या संपर्कात बरेच आमदार असल्याचे व यथावकाश अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे सांगत जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट केला.

राज्याच्या राजकारणात खळबळ
महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल, यात कसलीही शंका नाही. मी तर अनेक वेळा म्हणालोय की, हे सरकार दीर्घकाळ चालेल. पाच वर्ष ही कमी मुदत आहे. पण, बडेजाव करणार नाही. गेल्या काही दिवसात भाजपाच्या वेगवेगळ्या भागातील नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि त्यांची देखील राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. ते ज्या वेळी येतील, त्यावेळी कळेल. आपण अंधारात प्रवेश घेणार नाही. दिवसाढवळ्या घेणार आहोत, असे सांगत जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या