24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात अर्थमंत्री सीतारामन यांच्या फोटोला काळे फासले

पुण्यात अर्थमंत्री सीतारामन यांच्या फोटोला काळे फासले

एकमत ऑनलाईन

पुणे : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या फोटोला फासले काळ आहे. हा प्रकार पुण्यातील धनकवडीतील अहिल्यादेवी चौकात घडला आहे. खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरी निर्मला सीतारमण गेल्या होत्या. बुधवारी निर्मला सीतारमण यांनी आमदार भीमराव तपकीर यांच्या धकनवडीतील घरी मुक्काम केला होता. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हा फ्लेक्स लावण्यात आला होता. त्याच फ्लेक्सला अज्ञातांकडून काळे फासण्यात आले आहे.

खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांच्याच मतदार संघात घडला प्रकार आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण तीन दिवसांच्या बारामती दौ-यावर आहेत. अनेक बैठका आणि त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात मॅरेथॉन दौरा आहे. मिशन बारामती असे या दौ-याला संबोधले जात आहे. मात्र बारामतीला भाजप संघटना मजबूत करायला मी बारामतीचा दौरा करत आहे. बारामतीला टार्गेट करायला मी बारामतीत जाणार नाही, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायला हवे, भारतात सगळीकडे आम्ही लक्ष घातले आहे, फक्त बारामती नाही, असे निर्मया यांनी स्पष्ट केले होते.

महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज वारजे येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या गाडीचा ताफा अडवला. यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात आणि ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या