21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रकदम मेमोरियल फाउंडेशनकडून संकेत सरगरच्या कुटुंबाला आर्थिक मदत

कदम मेमोरियल फाउंडेशनकडून संकेत सरगरच्या कुटुंबाला आर्थिक मदत

एकमत ऑनलाईन

सांगली : कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणा-यासांगली येथील संकेत सरगरच्या कुटूंबाला अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशन कडून एक लाखाची मदत जाहीर केलीय. तसेच काँग्रेस नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून दिग्विजय अकॅडमीला पाच लाखाची मदतीची घोषणा केलीय. या अकॅडमीत संकेत सराव करत असे.

सांगली येथील संकेत सरगरच्या सांगलीतील अहिल्यादेवी होळकर चौकातील घरी विश्वजीत कदम यांनी भेट दिली.यावेळी संकेत सरगरचे प्रशिक्षक मयूर सिंहासनं देखील उपस्थित होते. यावेळी संकेत सरगरच्या आई-वडिलांसह त्याची वेटलिफ्टर बहीण काजल सरगरच्याही कामगिरीचं कौतुक केलं. तसेच दिग्विजय अकॅडमी मधून पुढचा संकेत देखील घडावा, अशी अपेशा व्यक्त करत या अकॅडमीला पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री शिंदेकडून तीस लाखांची मदत
कॉमनवेल्थ स्पर्धा २०२२ वेटलिफ्टिंग खेळातील ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणा-या महाराष्ट्रातील सांगलीकर संकेत सरगर ला राज्य सरकारच्या वतीने ३० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या