32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeमहाराष्ट्रहांडेवाडीतील भाजी मंडईला आग; ९० स्टॉल भस्मसात

हांडेवाडीतील भाजी मंडईला आग; ९० स्टॉल भस्मसात

एकमत ऑनलाईन

पुणे : हडपसरमधील हांडेवाडी भागात असलेल्या भाजी मंडईत मध्यरात्री आग लागली. आगीत भाजीपाल्याचे ९० स्टॉल जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत भाजीपाल्याचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

हांडेवाडी रस्त्यावर चिंतामणीनगर परिसरात भाजी मंडईत मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर लाकडी स्टॉलने पेट घेतला. स्टॉलमध्ये भाजीपाला आणि साहित्य होते.

आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत भाजीपाल्याचे ९० स्टॉल भस्मसात झाले. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या