पुणे : पुण्यातील गजबजलेल्या भागात गोळीबार केल्याची घटना घडली आहे. कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट या भागात एका तरूणाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात एक तरूण किरकोळ जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने दुस-यावर पूर्व वैमनस्यातून छ-याच्या बंदुकीतून गोळी झाडली आहे. हे दोघेही एकमेकांना ओळखतात पण पूर्वीच्या वादाचा बदला म्हणून हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.