24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत शॉपिंग सेंटरबाहेर गोळीबार

मुंबईत शॉपिंग सेंटरबाहेर गोळीबार

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील लिंकिंग रोड परिरातील गॅजिबो शॉपिंग सेंटरबाहेर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पण या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती खार पोलिसांनी दिली.

खार पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून गोळीबाराची बातमी कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पण सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती कळताच खार पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणाची चौकशी खार पोलिस करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या