22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रआधी ‘पटक देंगे’ म्हटलं आणि नंतर अमित शाह मातोश्रीवरच आले

आधी ‘पटक देंगे’ म्हटलं आणि नंतर अमित शाह मातोश्रीवरच आले

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना खासदार अरंिवद सावंत यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या मिशन मुंबईवर अराविंद सावंत यांनी टीका केली आहे. भाजपचे सगळे तसेच असते, त्यांचे नुसते मिशन असते, आज काय लोटस मिशन, परवा काय दुसरं मिशन असतं. त्यामुळं मूळ प्रश्न मिसींग असतात. अनेक गोष्टींपासून ते दूर आहेत. जनतेच्या प्रश्नांपासून दूर आहेत, मराठी माणसांच्या अस्मितेपासून ते दूर आहेत. मुंबई महापालिका म्हणजेच शिवसेनेचा भगवा झेंडा कुणीही तिथून हलवू शकत नाही, असं अरंिवद सावंत म्हणाले.

मुंबईत विविध जाती, धर्म, पंथाची माणसं शांततेनं राहतात. दुष्काळ असला तरी मुंबई शहराला पाणी मिळतं याचा कुणी विचार केला का? अप्पर वैतरणा, लोअर वैतरणा आणि मिडल वैतरणा धरण बांधून पूर्ण झाले. मिडल वैतरणा धरणाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. ते धरण मुंबई महापालिकेच्या पैशातून बांधण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या दूरदृष्टीमुळे हे झाले. त्यावेळी राज्य सरकार वेगळे होते आणि केंद्र सरकार वेगळे होते ,त्यांनी निधी दिला नाही. पण, मुंबई महापालिकेने पैसे खर्च करुन धरण बांधलं. दुष्काळी स्थिती असली तरी मुंबईकरांना पाणी मिळतं त्याला कारण शिवसेना आहे. ज्याने आपल्याला पाणी दिलं त्याला मुंबईकर कसा विसरेल, असं अरंिवद सावंत म्हणाले.

संजय राऊत यांच्या प्रकरणात नवी तारीख मिळाली आहे. ती कायदेशीर बाब आहे. सगळीकडे तारीख पे तारीख सुरु आहे. न्याय वेळेत मिळाला नाहीतर तो न्या नसतो, असं देखील ते म्हणाले.
शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका यांचं नातं दृढ आहे. कुणी कितीही वल्गना करुद्यात. बंगाल, पंजाब आणि दिल्लीत भूईसपाट झाले तेच मुंबईत होणार, मुंबईकर सूज्ञ आहेत. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई महापालिका चालवते, ते उद्धव ठाकरेंच्या दूरदृष्टीमुळं सुरु आहे. पोठात एक आणि ओठात एक ही पद्धत कुणाकडे आहे याची कल्पना सर्वांना आहे. अमित शाह त्यावेळी हरियाणाला का गेले होते. महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झाला होता. तुम्ही शब्द दिल्याचे उद्धव ठाकरे सांगत होते. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात न येता हरियाणाला गेलात. नंतर सहा महिन्यांनी बोलला होता ते गझनी सारखे असते, असे अरविंद सावंत म्हणाले. पटक देंगे म्हणल्यानंतर मातोश्रीवर का आला होता? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या