बिलोली : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीतच लग्न मुहूर्त ठरलेले देगलुर- बिलोली मतदार संघाचे कॉगे्रस आ. जितेश अंतापूरकर यांना फ्लोअर टेस्टसाठी मुंबईत थांबणे बंधनकारक झाले आहेÞतयारी पुर्ण झालेल्या लग्नाला केवळ दोन दिवस उरले असून ऐन आनंदाच्या मुहर्तावर उद्भवलेल्या पेचप्रसंगामुळे आधी लग्नं कोंढाण्याचंÞÞ मग रायबाचं? अशा चर्चेला मतदार संघात उधान आले आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनं अवघ्या महाराष्ट्राच लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षातील प्रत्येक आमदाराला अत्यंत महत्व आले असून यांच्याकडे अख्या मिडियाचे कॅमेरे वळत असतांना दिसून येत आहेत.जो तो पक्ष आपल्या आमदाराला तळहातातल्या फोडा प्रमाणे जपत असून महाराष्ट्राच्या राजधानीत येण्याचे आदेशच दिले आहेत.
अशा नाजूक परिस्थितीत देगलुर-बिलोली विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्या विवाहाचा मुहूर्त ठरला असून दि. ३ जुलै २०२२ रोजी दुपारी १२ वाजून २८ मिनीटाला देगलुर येथील एका मंगल कार्यालयात विवाहबध्द होणार आहेत.
आता या राजकीय नाट्यात पक्ष आदेशानूसार दिÞ ३० रोजी मुंबईत होणा-या फ्लोअर टेस्टसाठी थांबणे बंधनकारक झाल्याने आमदार जितेश अंतापुरकर यांची राजधानीतुन केंव्हा सुटका होणार इकडे आणि विवाहच्या बंधनात कधी अडकणार असा प्रश्न निमंत्रित पाहुणे,मित्र मंडळी व मतदारांना पडला आहे. सध्या विवाह सोहळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने आमदाराच्या विवाह निमित्तानं वधु वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीला लागली आहेत
अंगणी पाहुण्याची रेलचेल सुरू आहे. नवरदेवाला हळद लावण्याचीही लगबग होणार आहे,आळंक्याचीही तयारी करावी लागणार असून या दिवशी देवदेवतांना वंदन करण्यासाठी नवरदेवाची हजेरी महत्वाची मानली जाते अशा शुभ व आनंदाच्या मुहर्तावर या राजकीय नाटयात आधी लग्न कोंढाण्याचंÞÞ मग रायबाच? अशा चर्चेला या निमित्तानं उधान आले आहे. तर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळे राज्यातली बडी मंडळीही या विवाह सोहळ्याला येणार की नाही याकडे देगलुर- बिलोली मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे.