21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रदेशात पाच कोटी खटले प्रलंबित : किरेन रिजिजू

देशात पाच कोटी खटले प्रलंबित : किरेन रिजिजू

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : ‘‘देशाचे विधी व न्यायमंत्री म्हणून मी शपथ घेतली, त्यावेळी चार कोटी खटले प्रलंबित होते, आता तो आकडा पाच कोटींपर्यंत गेला. ब्रिटन, अमेरिकेत दिवसाला साधारणत: तीन ते चार खटले सुनावणीस घेतले जातात. मात्र, आपल्या देशात हीच संख्या ४० ते ५० आहे. त्यामुळे निकालाच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे,’’ असे मत केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश सुजाता मनोहर, निवृत्त न्या. रंजना देसाई, केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश अरविंद सावंत यांना मानद एल.एल.डी प्रदान करण्यात आली. रिजिजू म्हणाले, ‘वाढत्या खटल्यांमुळे काही प्रकरणे लवादात मिटवावीत. त्यानंतर महत्त्वाचे खटलेच दाखल करून घ्यावेत, असे न्यायाधीशांना सांगितले आहे.

लवादासाठी पावसाळी अधिवेशनात ‘मिडीएशन लॉ’ आणत आहोत. काही वकील मोफत खटला लढवतात मात्र, काहींचे शुल्क सामान्यांना परवडणारे नसते. न्यायापासून सर्वसामान्य माणूस वंचित राहू नये, ही आपली भूमिका असली पाहिजे.’

कुठल्या रांगेत बसायचे ते ठरवा वकिली क्षेत्रात येणा-या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराला भेट द्यावी, तिथे प्रेरणा मिळेल, असे किरेन रिजिजू म्हणाले. एलएलबी शिक्षणावेळच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, माझ्या वर्गात तीन रांगा होत्या. पहिल्या रांगेतील न्यायाधीश झाले.

दुस-या रांगेतील प्रसिद्ध वकील झाले. तिस-या रांगेतील माझ्यासारखे राजकारणी होतात! त्यामुळे विद्यार्थ्यांनी ठरवायचे आहे की, आपल्याला कुठल्या रांगेत बसायचे आहे.

पदवी, पदव्युत्तरसह पदके : दीक्षांत समारंभात ५८ विद्यार्थ्यांना बीएएलएलबी आणि ६७ विद्यार्थ्यांना एलएलएम पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. मनस्वी शर्मा यांनी सुवर्णपदक तर, ऐश्­वर्या पांडे यांनी रौप्यपदक पटकावले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या