24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रचंद्रपूर घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

चंद्रपूर घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

एकमत ऑनलाईन

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे डिझेल टँकर व लाकडांनी भरलेल्या ट्रकमध्ये झालेल्­या भीषण अपघातात मृत्­युमुखी पडलेल्या नऊ जणांच्­या कुटुंबीयांना मुख्­यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य देण्­याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्­यमंत्री उद्धव ठाकरे यांच्­याकडे केली होती.

या मागणीच्­या अनुषंगाने मुख्­यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्­येकी पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्य्याची घोषणा केली आहे. अपघातानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्­यमंत्र्यांना पत्र पाठवून मुख्­यमंत्री निधीतून मृतांच्­या कुटुंबीयांना पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्­याची मागणी केली होती.
मुख्­यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्­याशी त्­यांनी चर्चादेखील केली.

जिल्­हाधिकारी अजय गुल्­हाने यांची भेट घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने याबाबतचा प्रस्­ताव शासनाला पाठविण्­याची विनंती केली. अजयपूर येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केली होती.

आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची तातडीने दखल घेत मुख्­यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्­यमंत्री सहायता निधीतून प्रत्­येकी पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या