24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमहाराष्ट्रफ्लिपकार्टकडून राज्याला ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत

फ्लिपकार्टकडून राज्याला ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.३० : कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत सहभागी झालेल्या फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीने राज्याला ३० आयसीयू व्हेंटिलेटर मदत म्हणून दिले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबद्दल फ्लिपकार्टचे आभार मानले.

कोरोनाच्या संकटाशी अवघे जग मुकाबला करत असून आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे वैद्यकीय सहाय्यासाठी अनेक खाजगी कंपन्या पुढे आल्या आहेत. ‘फ्लिपकार्ट’ या बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनीनेही महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआयडीसी)ला ३० जीवनरक्षक आयसीयू व्हेंटिलेटर्स मदत म्हणून दिले आहेत. फ्लिपकार्टच्या व्यापक मदतकार्याचा हा एक भाग आहे. या माध्यमातून कंपनी विविध राज्यांना आयसीयू व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देणार आहे.

फ्लिपकार्टचे वरिष्ठ अधिकारी रजनीश कुमार यांनी यासंदर्भात बोलताना, “कोविड-१९ विरोधातील लढा फार मोठा आहे, यात प्रत्येकानेच सहकार्य करायला हवे, असे सांगितले. या आव्हानात्मक काळात समाजाच्या उपयोगी येण्याची संधी मिळणे हा आमचा सन्मान आहे. सुयोग्य उपकरणांसह आरोग्य यंत्रणेला बळकटी देणे ही काळाची गरज आहे आणि या सुविधा उपलब्ध करून देण्यास विविध भागधारक आणि राज्य सरकारांसोबत काम करण्यास फ्लिपकार्ट बांधिल आहे. आयसीयू व्हेंटिलेटर्समुळे अत्यावश्यक वैद्यकीय सेवेला हातभार लागेल असा विश्वास रजनीश कुमार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फ्लिपकार्टने केलेल्या या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. महाराष्ट्र आणि देशभरात विविध उपक्रम हाती घेऊन फ्लिपकार्टने कोविड-१९ विरोधी लढ्यात अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आपण कोविड-१९ शी लढत असताना राज्याला केलेले हे सहकार्य आणि आपल्या अत्यावश्यक सेवेला बळकटी देईल. आयसीयू व्हेंटिलेटर्समुळे राज्यातील आरोग्य सेवेला मदत होईल, असे प्रतिपादन सुभाष देसाई यांनी केले.

मागील १५ महिन्यांत फ्लिपकार्टने देशभरातील राज्य सरकारे आणि स्थानिक प्रशासनाला मदत केली आहे. याशिवाय आपल्या पुरवठा साखळीच्या माध्यमातून वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करण्यातही मदत केली आहे.

सात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, राहुल गुप्ता उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या