22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रअन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री शिंगणे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईल, असे राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत. त्यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल. राजेंद्र शिंगणे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी ते आहेत. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमध्ये राजेंद्र शिंगणे यांनी पाचव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.

 

घाऊक महागाई दराची गगनाकडे झेप!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या