25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रकोरोनासाठी प्रत्येक आमदाराला निधीतून १ कोटी खर्चाची मुभा

कोरोनासाठी प्रत्येक आमदाराला निधीतून १ कोटी खर्चाची मुभा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शुक्रवार दि़ १६ एप्रिल रोजी आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदारांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित आमदारांना आपापल्या मतदारसंघात हा निधी खर्च करता येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

पुण्यातील विधान भवन येथे पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांनी निर्बंध पाळून प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा मागील वेळाप्रमाणे कडक लॉकडाउन जाहीर करावा लागेल, असा इशारा देखील दिला. कोरोना आजाराचे जगावर संकट आले आहे. त्यामुळे ससून येथील डॉक्टरनी संप पुकारू नये. त्यांच्या मागण्या समजून घेऊ आणि त्यातून मार्ग काढला जाईल. मात्र त्यांनी टोकाची भूमिका घेतली. तर सरकारला देखील काही नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागेल. तशी वेळ डॉक्टर मंडळीनी येऊ देऊ नये. असा इशारा देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला.

प्रत्येक पेशंट रेमडेसिवीरची गरज नाही
आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली त्यावर अजित पवार म्हणाले की, असे अजिबात चित्र झालेल नाही. उगाच त्या यंत्रणेला ना उमेद करू नका. ती यंत्रणा वर्ष झाले जिवाच रान करत आहे. प्रत्येक पेशंटला रेमडेसिवीर देण्याची गरज नाही. असे तज्ज्ञ सांगतात. पण डॉक्टर रेमडेसिवीर आणा असे सांगतात. मग पेशंट खासदार आमदारांना फोन करायला लागतात.

यंदा फक्त आमदार निधीतूनच कामे
राज्य विधिमंडळातील उभय सभागृहातील आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरीस जाहीर केला. यामुळे राज्य विधिमंडळातील आमदारांना लागोपाठ दुस-या वर्षी निधीत वाढ मिळाली. कोरोनामुळे लागोपाठ दुस-या वर्षी खासदार निधी गोठविण्यात आल्याने यंदा राज्यात फक्त आमदार निधीतूनच कामे केली जातील.

उस्मानाबादेत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्वत्र गर्दी कायम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या