30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रपरप्रांतिय मजुरांनी धरली परतीची वाट

परप्रांतिय मजुरांनी धरली परतीची वाट

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन लावणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्याची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र परराज्यातील मजुरांनी या लॉकडाऊनच्या भीतीने पुन्हा आपल्या मूळ गावाकडं परतण्यास सुरुवात केलीय. मंगळवारी कुर्ला रेल्वे स्थानकावर अशाच स्थलांतरीत मजुरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. याठिकाणी मजूर मोठ्या संख्येने आल्याचे पाहायला मिळाले.

राज्यात पुन्हा एकडा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या लॉकडाऊनमध्ये झाले तसे हाल होऊ नये म्हणून परराज्यातील मजुरांनी पुन्हा गावचा रस्ता धरला आहे. यात नेहमीच्या रेल्वेंबरोबरच काही स्पेशल ट्रेनदेखिल आज मंगळवार रोजी रवाना होणार आहेत. त्या पार्श्नभूमीवर आपल्या गावी परतणा-या मजुरांची मोठी गर्दी कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवर पाहायला मिळाली. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी आपलं गाव गाठण्यासाठी या मजुरांनी परतीचा मार्ग स्वीकारला आहे. कुर्ला स्टेशनवरून मंगळवारी एकूण २३ रेल्वे रवाना होणार आहे. त्यामुळे यातून प्रवास करणा-या मजूर, कामगार यांची गर्दी कुर्ला स्टेशनबाहेर होती.

मध्य रेल्वेच्या प्रमुख जनसंपर्क अधिका-यांनी मात्र ही गर्दी अचानक झालेली नसल्याचे म्हटले उन्हाळ्यात सोडल्या जाणा-या विशेष रेल्वे आणि दैनंदिन गाड्यांमधीलच हे सर्व प्रवासी असल्याचं त्यांनी सांगितलं. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये काही विशेष रेल्वे सोडल्या जात असतात. त्यामुळे ही गर्दी उन्हाळ्यात गावी जाणा-यांची आहे असे ते म्हणाले. नेहमीच्या गर्दी प्रमाणेच ही गर्दी असल्याचे त्यांनी म्हटले. ज्या प्रवाशांचे कन्फर्म बुकींग असेल त्यालाच प्रवासाची परवानगी असल्याचेंही त्यांनी सांगितले. तसंच गर्दीचा विचार करून जवळपास सहा स्थानकांवरील तिकिट काऊंटर बंद केल्याची माहितीही त्यांनी दिली.या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला अ कुर्ला स्टेशनबाहेर असलेली ही गर्दी अचानक झालेली गर्दी नसली तरी कोरोनाच्या परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी जमल्यानं संसर्गाचा धोका वाढणार आहे.

लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही : बाळासाहेब थोरात
राज्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता १४ दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राज्यात लॉकडाऊन जाहीर करत असतानाच गोरगरीब लोकांना फटका बसणार नाही तसंच परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात जायचं आहे त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी कालावधी दिला जाई अशीही माहिती थोरातांनी दिली. महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब लोकं आहेत त्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तर मदत केली तर काही आर्थिक मदत सुद्धा करता येईल. आर्थिक मदती करता राज्य सरकार अनुकुल असून केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करणे आवश्यक असल्याचे थोरात म्हणाले.

कामगारांची सर्व काळजी घेईल
हसन मुश्रीफ यांनी राज्यातील परप्रांतीय कामगारांना गावी न जाण्याचे आवाहन केले आहे. राज्यात लॉकडाऊन जरी जाहीर केला गेला तरी सरकार सर्व परप्रांतीय कामगारांची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये , असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

पंढरपूर-मंगळवेढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या