28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रभेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

भेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

एकमत ऑनलाईन

नागपूर : सध्याच्या कठीण काळात कोरोनाचा धोका वाढत असताना स्वत:ची, परिवाराची आणि समाजाची जास्तीत जास्त काळजी घ्या. निष्काळजीपणा करू नका. त्याचबरोबर राजकारण न करता सगळ्यांना मदत करा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतून आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भाजपाच्या नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना सध्याच्या परिस्थितीच्या भीषणतेची जाणीव करून दिली. त्याचसोबत लोकांना मदत करताना आपण स्वत:ची, आपल्या परिवाराची काळजीही घ्यायला हवी असा सल्लाही दिला. त्याचबरोबर आपण करत असलेल्या मदतकार्याचा गवगवा न करता नि:स्वार्थ भावनेने काम करण्याचे फायदेही त्यांनी कार्यकर्त्यांना पटवून दिले. आपल्या भाषणात ते म्हणतात, राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टींमध्ये बोर्ड, झेंडे लावले पाहिजेत असे नाही. अशावेळी आपण जर काही राजकारण केलं तर लोकांना मनातून ते आवडत नाही.

समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण म्हणजे राजकारण
समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ आहे. नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच काही त्याच्यातला भाग नाही. पण मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की समाजाच्या मागे, गरीब माणसाच्या मागे, जात, पंथ, धर्म, पार्टी, पक्ष विसरून सगळ्यांच्या मागे आपण योग्य प्रकारे मदतीसाठी उभं राहणं हे महत्त्वाचं आहे.

लातूर जिल्ह्यातील ६८ हजार नागरिकांनी हरवले कोरोनाला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या