26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र फॉर्म नं. १७ करिता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

फॉर्म नं. १७ करिता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

एकमत ऑनलाईन

पुुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७ भरून प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाईनद्वारे नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावत्याच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्राच्या शाळेत अथवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांच्या याद्या ५ जानेवारी रोजी जमा कराव्या लागणार आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या