23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या

भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या

एकमत ऑनलाईन

पुणे : आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने दोन दिवसांपूर्वी घरगुती कारणाहून आत्महत्या केली होती. आता या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. हुंड्यात ठरलेल्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून प्रियांका उमरगेकर यांचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून सुनेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी आळंदी पोलिसांनी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे, त्यांचे पती अशोक उमरगेकर आणि मुलगा अभिषेक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आत्महत्या केलेल्या प्रियांका घोलप या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांच्या त्या कन्या होत्या.

याबाबत आळंदी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियांका आणि अभिषेक यांचा ९ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आळंदीच्या भाजपाच्या माजी नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर तसेच मुलीच्या घरातील व्यक्ती देखील राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने या विवाह सोहळ्याला राजकारणातील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती.

मात्र, गेल्या नऊ महिन्यांत नेमके काय कारण घडले की प्रियांका यांनी आत्महत्या केली. मात्र, आता ते कारण समोर आले आहे. लग्नानंतर सासरच्यांकडून छळ, अपमानास्पद वागणूक देण्यात येत होती. या सगळ्या त्रासाला कंटाळून प्रियांका यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार पोलिसांनी तपास करून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या