24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोनाबाधित

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोनाबाधित

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे म्हणजे राज्याच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी निलंगा येथून पुण्यात हलवण्यात आले आहे. या आधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

निलंगेकर यांना गेल्या ३ दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांची तपासणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. प्रारंभी त्यांच्यावर निलंगा येथे उपचार करण्यात आले. आता पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आले आहे. या अगोदरही माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनाही नांदेड येथून मुंबईला हलविण्यात आले होते. तत्पूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारानंतर हे नेते कोरोनामुक्त झाले.

Read More  फोर्ट येथे भानुशाली इमारत कोसळली; मलब्याखाली अनेक जण अडकल्याची भीती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या