24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रमाजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉ. मधू पाटील यांचे निधन

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉ. मधू पाटील यांचे निधन

एकमत ऑनलाईन

सांगली : डॉ. मधू प्रकाश पाटील यांचे काल रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या वय ४४ वर्षांच्या होत्या.माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात, काँग्रेसचे खासदार स्व. प्रकाशबापू पाटील आणि काँग्रेसच्या नेत्या श्रीमती शैलजा पाटील यांच्या कन्या, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या त्या भगिनी होत.

त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी पद्माळे येथे अंत्यसंस्कार होत आहेत. काल रात्री आठच्या सुमारास पुणे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आरोग्य क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या