25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रमाजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे निधन

माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे निधन

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : वृत्तसंस्था
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बॅरिस्टर बलभिमराव नरसिंगराव देशमुख (बी. एन. देशमुख) यांचे दु:खद निधन झाले. त्यांनी काल (ता.२९) रात्री औरंगाबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांचे मूळ गाव तुळजापूर तालुक्यातील काठी हे आहे. शेतकरी ,कष्टकरी कामगार तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ऐतिहासिक ठरले होते.

त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, दोन नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी राज्यसभा सदस्य अँड. नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र होत. माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे ते भाचे होत. उच्च न्यायालयात बहुजन समाजाचे जजेस हा एक कल्पनाविलास होता. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हस्तक्षेप केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात सावंत, देशमुख, कोळसे अशी वहिवाट पडली आणि ती सार्थ ठरविणाºयापैकी बी. एन. देशमुख हे एक नाव आहे.

Read More  माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

त्यांचे वडील उस्मानाबाद येथे वकिली व्यवसाय करीत असत. न्यायमूर्ती देशमुख यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंड येथे झाले. शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर मुबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायाला स्व. रामराव आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. औरंगाबाद खंडपीठ सुरुवात झाल्याबरोबर त्यांनी मुंबई येथील वकिली व्यवसाय बंद केला आणि औरंगाबाद येथे वकिली करण्यास प्रारंभ केला. त्यांचे बुध्दीचातुर्य पाहून त्यांची १९८६ मध्ये न्यायमूर्तीपदी नेमणूक झाली.

त्यांनी ऊस पिकवणाºयांना न्याय मिळावा म्हणून महत्वपूर्ण निकाल दिले. ते १९९७ साली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी शासनाचे कोणतेही पद स्वीकारले नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकीलीस प्रारंभ केला. त्यांच्या वयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकिली व्यवसाय बंद केला आणि दिल्ली सोडून ते औरंगाबादला स्थायिक झाले. विशेष म्हणजे ते शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषदेचे ६ वर्ष सदस्यही होते. त्यांनी विधान परिषदेचे सदस्य असताना शासनाला अनेक प्रश्नावर धारेवर धरले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या