26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमाजी मंत्री खोतकर शिंदे गटात

माजी मंत्री खोतकर शिंदे गटात

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यामागून धक्के बसत आहेत. माजी मंत्री तथा जालन्याचे शिवसेनेचे बडे नेते अर्जुन खोतकर यांनी शनिवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात अगोदरच खिळखिळ््या झालेल्या शिवसेनेला जबर झटका बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जालन्याच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. आज सकाळी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. माझ्यावर बेतलेल्या प्रसंगाची त्यांना माहिती दिली. संजय राऊतांशीही बोललो. सगळ््यांची मते जाणून घेऊन मी शिंदेगटात जाण्याचा निर्णय घेतला, असे खोतकर म्हणाले. समर्थन केले म्हणजे संबंध तुटतात, असे नाही. आमचे ४० वर्षांचे संबंध आहेत. मी पक्ष प्रमुखांना चार वेळा फोन केला, त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांना पूर्ण कल्पना दिली, असेही खोतकर म्हणाले.

आपण आजपर्यंत शिवसेनेची प्रामाणिकपणे सेवा केली. मी व माझ्या सहका-यांनी सेनेचे जालन्यात वर्चस्व निर्माण केले. सामान्य माणसांनीही आमच्यावर विश्वास टाकला. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदारांनी आमच्या झोळीत भरभरून मतदान टाकले. पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी खोतकर म्हणाले की, लोकसभेचा आग्रह सोडलेला नाही. हा प्रश्न आता एकनाथ शिंदे आणि फडणवीसांकडे मांडला. ते निर्णय घेतील. मी एकाही शिवसैनिकाला आपल्यासोबत येण्याचे सांगितले नाही, असे खोतकर म्हणाले. मी जालना फॅक्ट्रीच्या व्यवहारामुळे अडचणीत आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कुटुंबाला होणा-या त्रासामुळे निर्णय
घरी आलो की कुटुंब दिसते. त्यामुळे काही ठोस निर्णय घेणे गरजेचे होते. या गोष्टी मी उद्धव ठाकरेंच्याही कानावर घातल्या. त्यांनीही मला माझा निर्णय घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे मी आज शिवसैनिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे खोतकर म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या