34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home महाराष्ट्र माजी खासदार, जेष्ठ काँग्रेस नेते रामकृष्ण बाबा पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

माजी खासदार, जेष्ठ काँग्रेस नेते रामकृष्ण बाबा पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व काँग्रेसचे जेष्ठ नेते रामकृष्ण बाबा पाटील (91) यांचे बुधवारी सकाळी 6.30 वाजता अल्पशा आजाराने औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.

पंचायत समितीचे सभापती ते खासदार हा त्यांचा राजकीय प्रवास तसेच जिल्हा सहकारी बँक चेअरमन हा सहकार क्षेत्रातील प्रवास होता. औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील ‘बाबा माणूस’ ही त्यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर बोर दहेगांव ता.वैजापूर येथे आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात आप्पासाहेब, काकासाहेब ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

वैजापूर तालुक्याचे आमदार पद भूषविले

1970 साली सरपंच पदापासून त्यांनी आपल्या आपल्या राजकारणाची सुरुवात केली. रामकृष्ण बाबा यांनी 1985 साली वैजापूर तालुक्याचे आमदार पद भूषविले. हे पद 1995 पर्यंत त्यांनी कायम ठेवले. याशिवाय 1998 – 99 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली व ते 12 व्या लोकसभेचे खासदार झाले. रामकृष्ण बाबांनी पंचायत समितीचे सभापती भूषविले. 25 वर्ष जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑ.बँकेचे पाच वर्ष संचालक म्हणूनही बाबांनी काम केले.

शेती तंत्रज्ञानातील बदल जाणून घेतले

रामकृष्ण बाबा यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दहावी पास असलेल्या बाबांचे शेती विषयातील ज्ञान आणि मोठा अनुभव होता. त्यामुळे 1994 साली अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे जाऊन त्यांनी शेती तंत्रज्ञानातील बदल जाणून घेतले होते. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी त्यांचा थेट संपर्क होता.

तरुणांना भाषण नको आहे, नोकऱ्या पाहिजे-प्रियंका गांधी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या