नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन झाले. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मा. गो. वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते़ १९६६ पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणाºया मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते.
मॉरिस कॉलेजमध्ये असताना १९४३ सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. १९४८ साली गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे सुगम संघ नावाचे हिंदी पुस्तक मा. गो. वैद्यांनी लिहिले आहे, ते नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केले. त्याची ई-आवृत्ती ६ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झाली होती. १९७८ साली मा. गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यावेळची त्यांची कारकीर्दही उल्लेखनीय राहिली.
११ महिन्यांत मुंबईत ९०० आत्महत्या