27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रसांगलीत चौघा साधूंना बेदम मारहाण

सांगलीत चौघा साधूंना बेदम मारहाण

एकमत ऑनलाईन

सांगली : मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जत तालुक्यातील लवंगा या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशमधील लवंगा या ठिकाणाहून आलेल्या चौघा साधूंना चोर समजून ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने पालघरसारखी घटना होता-होता टळली आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.

जत तालुक्यातल्या उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लवंगा येथे चौघा साधून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरहून जत तालुक्यातील लवंगा मार्गे पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी लवंगा या चौघा साधूंनी रात्रीच्या सुमारास गावातल्या एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून निघाले. त्यावेळी एका मुलाला त्यांनी रस्ता विचारला, त्यातून ही मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला. त्यातून साधू आणि ग्रामस्थांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. यातून संतप्त ग्रामस्थांनी साधूंना बेदम मारहाण केली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या