24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रकागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठाकरे गटाला चार आठवड्यांची मुदतवाढ

कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठाकरे गटाला चार आठवड्यांची मुदतवाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे या वादामध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून मागण्यात आलेली चार आठवड्यांची मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील वाद हा सर्वोच्च न्यायालयात असून त्यासंबंधी याचिका निकाली लागल्याशिवाय निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. शिवसेनेवर वर्चस्व कुणाचे, धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे? याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता उद्धव ठाकरे गटाला आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अजून चार आठवड्यांची मुदत मिळणार आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातही ठाकरे-शिंदे गटातील वादाशी निगडित अशा एकूण पाच याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

लोकसभा, विधानसभा आणि पाठोपाठ शिवसेनेच्या राजकीय पक्षरचनेतही आपले प्राबल्य असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यासाठीची आकडेवारी देखील निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली आहेत. भाजपासोबत सरकार बनवणा-या एकनाथ शिंदे यांनी १९ जुलै २०२२ रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळावे अशी मागणी केली होती.

शिवसेनेला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह १९ ऑक्टोबर १९८९ रोजी मिळाले. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी निवडणूक आयोगाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांना पक्षाचे प्रमुख म्हणून कार्यकारिणी समितीत निवडण्यात आले. तर उद्धव ठाकरे यांनी २३ जानेवारी २०१८ रोजी पाच वर्षांसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेता म्हणून निवड केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या