22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रकोल्हापूरात महापूराच्या आठवणी झाल्या ताज्या

कोल्हापूरात महापूराच्या आठवणी झाल्या ताज्या

- राजाराम आणि शिंगणापूर बंधारे पाण्याखाली

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवार दि़ १६ जून रोजी दुपारी राजाराम आणि शिंगणापूर बंधारे पाण्याखाली गेले. जिल्हा प्रशासनाने या दोन्ही बंधा-यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली असून, नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. मान्सूनने सुरुवातीलाच जोरदार सलामी दिल्याने गेल्या वर्षातील महापुराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

दबकत आलेल्या मान्सूनने अखेर कोल्हापूर जिल्ह्यात जोर पकडला. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिली. धरणक्षेत्रातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी पुलाच्या खाली सुमारे एक फूट होती. दुपारी तीनच्या सुमारास नदीचे पाणी बंधा-यावरून वाहू लागले.

पावसाचा जोर लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने या मार्गावरील वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळवली. राजाराम बंधा-यासह शिंगणापूर बंधाराही मंगळवारी दुपारी पाण्याखाली गेला. राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली धरणांमधील पाणीसाठाही झपाटयाने वाढत आहे.

मान्सूनच्या पहिल्याच पावसात पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. येणारे तीन-चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाच्या जोरदार सलामीने कोल्हापूरकरांच्या गेल्या वर्षातील महापुराच्या आठवणी जाग्या होत आहेत.

Read More  पर्रीकरनंतर भाजप आमच्यासाठी संपले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या