27 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रभाजप दाखवण्यापुरता मित्र...; युतीवर मनसेचें स्पष्टीकरण'

भाजप दाखवण्यापुरता मित्र…; युतीवर मनसेचें स्पष्टीकरण’

एकमत ऑनलाईन

मुंबई : मागील काही दिवसांपासून मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चांना वेग आला होता. यावर स्पष्टीकरण देताना मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की, ‘‘भाजपला दाखवण्यापुरते मित्र आहेत. आम्ही त्यांना फारसं महत्व देत नाही’’.

राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकारच्या आधीपासूनच भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच गणेश उत्सवा दरम्यान मनसे आणि भाजपा यांच्या भेटीगाटी वाढल्यानंतर युतीबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौ-यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मनसे भाजपा युतीवरती स्पष्टीकरण दिले आहे.

आम्ही अजून कुठेही आमची युती होतेय, असे म्हटलेले नाही. आम्ही सगळ्या जागांवर लढणार आहोत. आमचे सगळ्या पक्षात मित्र आहेत. नागपुरातून राज ठाकरेंनी येत्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ फोडला आहे, असंही अविनाश जाधव यावेळी म्हणाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या