22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्र10 ऑगस्ट पासून आम्ही रस्त्यावर उतरणार-प्रकाश आंबेडकर

10 ऑगस्ट पासून आम्ही रस्त्यावर उतरणार-प्रकाश आंबेडकर

एकमत ऑनलाईन

पुणे : ५ टक्के कोरोना रुग्णांसाठी ९५ टक्के जनतेस घरात का कैद करीत आहात? असा सवाल राज्य सरकारला विचारत महाराष्ट्रातील सेवा सुरु करा, टपरीवाले फेरीवाले याना त्यांचे आयुष्य जगू द्या. आता निर्णयाची गरज आहे, शासनाने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी कोणत्याही वेळेला रस्त्यावर उतरेल ,असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांच्यावर चांगले उपचार करा, त्यांना चांगले औषध द्या, मात्र उरलेल्या लोकांना लॉकडाऊनच्या बंधनातून मुक्त करा. लॉकडाऊनमुळे सामान्य नागिरकांची उपासमार होऊ लागली आहे, याकडेही प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधलं.

राज्यात दहा हजार राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्यापेक्षा राज्य परिवहन सेवेला सुरुवात केली तर कर्मचारी कपात करण्याची वेळ येणार नाही,असं ते म्हणाले. मुंबईत अर्ध्यापेक्षा जास्त बस सुविधा सुरू करायला पाहिजे त्या अद्यापही झालेल्या नाहीत.

मुंबईसह इतर मनपा क्षेत्रातही बस सेवा सुरू करण्याची आता गरज आहे. त्याचबरोबर टपरीवाले, फेरीवाले यांना आता स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या. आज महाराष्ट्राला निर्णयाची गरज आहे. शासनाने 10 ऑगस्ट पर्यंत निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी केव्हाही आणि कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Read More  धावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या