मुंबई : बँकामध्ये पडून असलेल्या बेवारस पैशांबाबत भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता या पैशांचा वापर ठेवीदारांच्या जागरुकतेसाठी करण्याचा निर्णय आरसीबीने घेतला आहे. बचत खाते अथवा चालू खात्यांमधील रक्कम १० वर्षांपासून वापरण्यात आलेली नाही अथवा १० वर्षांच्या आतमध्ये या मुदत ठेवींचा दावा केला जात नाही. अशा रकमेला बँकेत पडून असलेली बेवारस रक्कम म्हटले जाते. या पैशांचा वापर आता ठेवीदारांच्या शिक्षण आणि जागरुकतेसाठी करण्यात येणार आहे.
ठेवीदार आपल्या जमा राशींवर दावा करू शकतात. बँकेत जमा असलेले पैसे व्याजासह (जे असेल ते) बँकाकडे असतात. बँकाकडून वारंवार याबाबत माहिती दिली जाते. तरीही ठेवीदारांकडून याबाबत प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या पैशांची संख्या वाढत जाते. याबाबत आरबीआयने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
बचत अथवा चालू खाते बंद न केल्याने बेवारस पैशांची संख्या वाढत जाते. तसेच या खात्याचा वापर न केल्याने ठरावीक कालावधीनंतर खाते बँकेकडून बंद करण्यात येते. त्यानंतर खातेदारांना कळवले जाते. त्यानंतरही प्रतिसाद येत नाही. अशा दहा वर्षांपर्यंतच्या खात्यातील पैशांना बेवारस म्हटले जाते. या पैशांबाबत आरसीबीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मृत खातेदारांची प्रकरणेही आहेत. ज्यामध्ये वारसदार सिद्ध न करू शकलेली अनेक खाती आहेत. या खात्यांमधील पैशांनाही बेवारस म्हटले जाते.