27 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमोदींवर पूर्ण विश्वास, ६ महिन्यांत राज्यात उद्योग येतील

मोदींवर पूर्ण विश्वास, ६ महिन्यांत राज्यात उद्योग येतील

एकमत ऑनलाईन

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दररोज यावरून राजकीय टीका टीप्पणी होत आहे. सत्ताधारी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार पर्यायी उद्योग येतील असं सांगत आहेत. तर विरोधक राज्याचं नुकसान झाल्याचं सांगत आहेत. त्यातच आता शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात त्यांच्यावर विश्वास आहे. पुढील सहा महिन्यात राज्यात नवीन उद्योग येतील, याची मला खात्री आहे. हे दोन महिन्यांचं किंवा दीड महिन्यांचं सरकार नाही. मागच्या सरकारने अडीच वर्षांत सरकारने काय प्रयत्न केले, कसे प्रयत्न केले, कशामुळे प्रकल्प तिकडे गेला हे दोन्ही सरकारचं काम पाहिल्यावर कळेल असंही सत्तार म्हणाले.

याआधी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी देखील राज्यात उद्योग आणण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचं म्हटलं. आता आमचे उद्योगमंत्री पुढे काम करतील. सरकारला जागेवर बसू तर द्या. शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती का घडली नाही, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या