कराड : स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी युतीचे राजकारण टाळून भविष्यातील निवडणुकीत एकट्याने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कटू अनुभवानंतर आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या एकूणच अधोगतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे शेट्टी यांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक काल कराडमध्ये पार पडली. यावेळी बोलताना शेट्टी यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी तयार राहण्याचे आदेश त्यांनी दिले. ते स्वत: ३१ ऑगस्टपासून दौरे करणार करणार आहेत. झेडपी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणा-या कार्यकर्त्यांनी नावे द्यावीत, अशी मागणी केली.
अशेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष महाविकास आघाडीचा भाग होता आणि त्याचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार आघाडीसोबत राहिले.मात्र, भुयार यांना त्यांच्या पक्षविरोधी कारवायांमुळे संघटनेतून काढून टाकण्यात आलं आहे.
सर्व पक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना शेट्टी म्हणाले की, राज्यातील राजकारणाची पातळी लक्षणीयरीत्या खालावली आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाशी संबंध ठेवणे त्यांच्यासाठी शक्य नाही. ‘‘राज्यातील अलीकडच्या घडामोडींनी हे सिद्ध केले आहे की राजकीय पक्षांनी सर्व विचारधारेला फाटा दिला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी संघटना म्हणून अशा वातावरणाचा भाग बनणे आम्हाला शक्य होणार नाही.