24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रदेशातील पहिल्या इलेक्ट्रीक एसी डबलडेकर बसचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन

देशातील पहिल्या इलेक्ट्रीक एसी डबलडेकर बसचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन

एकमत ऑनलाईन

मुंबई : आधुकनिकतेच्या दृष्टीकोणातून देशात आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी लाखो लोक लोकल आणि बस सेवेचा वापर करतात. त्यामुळे आता मुंबईतच्या बेस्ट बसेसच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक डबलडेकर बसचा समावेश करण्यात आला. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात इलेक्ट्रीक एसी डबल डेकर बसचे उद्घाटन करण्यात आले.

प्रदूषणाच्या दृष्टीने इलेक्ट्रीक बस हे प्रदूषण मुक्त देशासाठी महत्वाचे पाऊल असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच इलेक्ट्रीक बसने प्रवास करणे खूप स्वस्त असल्याचेही गडकरी म्हणाले आहेत. लक्झरी बसचा प्रवास सुरू करण्याच्या विचारावरही यावेळी त्यांनी भर दिला. लांबच्या पल्ल्याचा प्रवासही या प्रकारच्या बसने करता येईल. या बसने मुंबई-दिल्ली असा १२ तासांचा प्रवास करणे शक्य होईल असेही गडकरी यांनी म्हटले.

गडकरींच्या स्वप्नातील महामार्ग
यावेळी नितीन गडकरी यांनी त्यांच्या स्वप्नातील महामार्गविषयीही भाष्य केले. नरिमन पॉईंट ते दिल्ली असा मार्ग तयार करण्याचे स्वप्न असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले. यातून देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राचा व्यवसाय ५० लाख कोटींपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचेही गडकरी म्हणाले. आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात येणार आहे. तसेच उद्घाटन झालेल्या डबल डेकर एसी बस सप्टेंबर महिन्यापासून मुंबईकरांच्या सेवेसाठी सक्रिय असतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या