24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमाझे आणि गडकरींचे विचार जुळतात

माझे आणि गडकरींचे विचार जुळतात

एकमत ऑनलाईन

राज ठाकरे यांनी केले गडकरी यांच्या कामाचे कौतुक
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जे काही करतात ते वरुनच करतात, माझे आणि नितीन गडकरींचे विचार जुळतात कारण आमचे विचार भव्य-दिव्य आहेत, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ते विदर्भाच्या दौ-यावर असून त्यांनी आज नागपूर येथील फुटाळा लेकवरच्या लेझर शोच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्या कामांचे तोंड भरून कौतुक केले.

फुटाळा लेकवरचा लेझर शो पाहिल्यानंतर असे आजवर मी भारतात पाहिलेले नाही, असे जे काही पाहिले ते भारताच्या बाहेर पाहिले असे कौतुक राज ठाकरे यांनी केले. नितीन गडकरी खाली काहीच करत नाहीत. उड्डाणपूलही वर जातो, कारंजेही वर जातात. आमचे दोघांचे विचार मिळण्याचे कारण म्हणजे आम्ही जे काही करतो, ते भव्यदिव्य करतो. मी जे काही आज पाहिले ते अद्भूत आहे. हे फक्त नागपूरच्या लोकांसाठी नाही तर देशातील लोकांसाठी पाहण्यासारखी गोष्ट आहे, असे कौतुक राज ठाकरे यांनी यावेळी केले.

नितीन गडकरी यांनीदेखील यावेळी राज ठाकरे यांच कौतुक केले. राज ठाकरे हे तज्ज्ञ कलाकार आहेत. यावेळी नितीन गडकरी यांनी फुटाळा तलावात आगामी काळात मोठे हॉटेल उभारणार असल्याचे सांगितले. या तलावात ८० हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये हॉटेल बनवणार आहे. हे हॉटेल तलावात असेल आणि त्यासाठी बोटीने हॉटेलपर्यंत जाण्याची सुविधा करण्यात येणार आहे. शिवाय तलावाच्या शेजारी जवळपास ११०० वाहनांचे पार्किंग करण्यात येणार आहे. नागपुरात फुटाळा तलावामध्ये लोटस गार्डन बनवणार असून त्यासाठी कमळाच्या साडेसहाशे जाती गोळा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या