पुणे : सोशल मिडियावर जनसामान्य लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याकरिता तलवार, कोयत्यासह धारदार शस्त्र हातात घेऊन रिल्स बनविणा-या ३ तरुणांवर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत तिघांना गजाआड केले आहे. ओंकार बाळासाहेब कुंभार (वय-२३,रा.शिक्रापूर,पुणे), दुर्वाश शिवाजी क्षेत्री (२३,रा.शिक्रापूर,पुणे) व दिलावर सुभान शेख रा.शिक्रापूर,पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयकल यांनी शुक्रवारी दिली आहे.
सोशल मिडियावर रिल्स बनविणेकरिता व लोकात दहशत निर्माण करण्यासाठी जे कोणी सोशल मिडियाचा गैरवापर करत असतील त्यांची माहिती काढून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याचे सूचना पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसगार सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉटसअप, फेसबुक याची माहिती घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की शिक्रापूर गावाचे हद्दीत महाबळेश्वरनगर येथे लोकात दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मिडियावर रिल बनविण्याकरिता तीन मुले हातात कोयता व तलवार घेऊन रस्त्यावर फिरत आहे. त्यानुसार पोलिसांचे पथकाने तातडीने त्याठिकाणी जाऊन संबंधित तीन आरोपींना जेरबंद केले आहे.