21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सव, दहीहंडी आयोजन, राजकीय व सामाजिक आंदोलनं व कोरोना काळातील खटले मागे...

गणेशोत्सव, दहीहंडी आयोजन, राजकीय व सामाजिक आंदोलनं व कोरोना काळातील खटले मागे घेणार !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२७(प्रतिनिधी) मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे शिंदे सरकारवर टीका होत असली तरी दोन लोकांच्या या सरकारने निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाचे कार्यकर्ते, सामाजिक व राजकीय आंदोलन व कोरोना काळातील निर्बंधांच्या उल्लंघणाबद्दल दाखल झाले खटले मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली.

मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सध्या राज्यकारभाराचा गाडा हाकत आहेत. आज झालेल्या दोन सदस्यीय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये मार्च २०२२ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहे, असे खटले मागे घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे कोरोना काळात निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल हजारो लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे खटलेही मागे घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांवर खटले दाखल झाल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणीकिंवा पासपोर्ट व चारिर्त्य पडताळणीच्या वेळेस अडचणी येतात. त्यामुळे हे खटले मागे घेतले जाणार आहेत.

पोलीस आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेईल. आंदोलनामुळे जिवीत हानी झालेली नसेल व खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसेल, तरच गुन्हे मागे घ्यावेत ही अट या प्रकरणांमध्येही कायम ठेवण्यास आली आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव, दहीहंडी यामधील किरकोळ स्वरुपाचे गुन्हे देखिल मागे घेण्यासंदर्भात समितीने तातडीने निर्णय घ्यावेत, असे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या