अकोला: अकोला येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. चौघांनी मिळून हे कृत्य केल्याचं समोर येत आहे. अकोला येथे काल रात्री ही घटना घडली मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करुन १५ वर्षीय आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुली परतत होत्या.
रस्त्यात त्यांना एक तरुण दिसला. त्याने त्यांना घरी सोडतो म्हणून सोबत नेले. तिथे गेल्यावर त्यांना शीतपेयामधून गुंगीचे औषध दिले आणि चौघांनी मिळून अत्याचार केला. ही घटना काल सायंकाळी घडली आहे.
या घटनेतील सुरुवातीचा आरोपी तरुण यातील एका मुलीच्या ओळखीचा असल्याचे सांगितले जात आहे. त्याने घरी सोडतो असे सांगितले. नंतर चॉकलेट आणि शीतपेय दिले. यानंतर त्या मुलींची शुद्ध हरपली. चौघांनी अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांमध्ये मुलींच्या घरच्यांनी दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. या घटनेमध्ये पाच ते सहा जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.