23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home महाराष्ट्र मोफत अँटिजेन टेस्ट करा : सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लपवू नका

मोफत अँटिजेन टेस्ट करा : सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लपवू नका

नवी मुंबई : आपल्या विभागात कोरोना बाधितांचे मृत्यू का होतात? याचा शोध वैद्यकीय अधिकारी यांनी घ्यायला हवा. ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, ब्लडप्रेशर, हृदय विकार, किडनीचे आजार अशाप्रकारचे आजार असणाऱ्या व्यक्तींकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे. स्क्रिनिंग करताना ज्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे अशा भागावर विशेष लक्ष द्यावे, असे नवी मुंबईचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले.

नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील खाजगी व्यावसायिकांकडून तापाचे रुग्ण तसेच मधुमेह, ब्लडप्रेशर व इतर आजार असणा-या व्यक्तींची माहिती जमा करावी आणि त्यांची अँटीजेन टेस्ट करावी अशा सूचना दिल्या.

सर्वसाधारणपणे नागरिकांमध्ये ताप, खोकला असला तरी लक्षणे लपवून ठेवण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी मोफत उपलब्ध असलेली अँटिजेन टेस्ट करून घ्यावी. याविषयी अधिक जनजागृती करण्याबाबत आयुक्तांनी सूचना केल्या. तसेच याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घेण्यास सांगितले.

अँटिजेन टेस्टमुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी चिंतीत न होता रुग्ण लवकर सापडणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर आहे. हे लक्षात घेऊन रुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर आणि त्यातून कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर अधिकाधिक भर द्यावा, असेही आयुक्तांनी सांगितले.

Read More  दुधाच्या अनुदानासाठी जिल्ह्यात भाजपाचे आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
33FollowersFollow