24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रफूड डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचे जबरदस्तीने चुंबन

फूड डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचे जबरदस्तीने चुंबन

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यात फूड डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचं जबरदस्तीनं चुंबन घेत विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येवलेवाडी येथील एका सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधीत डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रईस शेख (वय ४०) असं आरोपी झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. १९ वर्षांची पीडित तरुणी एका नामांकित कंपनीत कामाला आहे. रात्री उशीरा येवलेवाडी इथल्या आपल्या घरी परतल्यानंतर तीनं झोमॅटोवरुन जेवण मागवलं. पार्सलची डिलिव्हरी घेऊन रईस शेख रात्री साडेनऊच्या सुमारास सोसायटीत दाखल झाला. जेवणाचं पार्सल तरुणीकडं देत त्यानं तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. पाणी प्यायल्यानंतर थँक्यू म्हणण्याच्या बहाण्यानं त्यानं तिचा हात पकडत आपल्याकडं ओढलं आणि तिच्या गालावर दोन वेळा चुंबन घेतलं.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळं तरुणी घाबरली आणि तिनं थेट पोलीस स्टेशन गाठलं. तसेच या प्रकरणी तीनं पोलिसांत तक्रारही दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आणि काही वेळातच त्याला अटक केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या