22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण २,१८५ उमेदवारांना तात्काळ नियुक्­ती पत्र द्या

राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण २,१८५ उमेदवारांना तात्काळ नियुक्­ती पत्र द्या

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण २१८५ उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र द्या, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पूर्व परीक्षा, मुलाखत, परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत.

याच काळामध्ये ९ सप्टेंबर २०२० पूर्वी महाराष्ट्र राज्यात विविध विभागांच्या भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. परंतु शासनाने कोविड या एकाच कारणास्तव पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्­ती पत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास २,१८५ उमेदवारांची काहीही चूक नसताना त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने दिलेल्या अंतिम निकालामध्ये ९ सप्टेंबर २०२० पूर्वी पूर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया या अबाधित राहतील असा स्पष्ट उल्लेख आहे.

सध्या लॉकडाऊन, कोरोना संकट, बेरोजगारी अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करून कष्टातून यश मिळवून देखील त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. पात्र उमेदवारांना आपल्या भविष्याची चिंता असून या नियुक्­तीबाबत त्यांच्या तीव्र भावना आहेत. मुख्यमंत्री या नात्याने २१८५ उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आपण गांभीर्यपूर्ण विचार करून उमेदवारांना नियुक्­ती पत्र लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेलद्वारे केली आहे.

रुग्णसंख्येत लक्षणीय घट, लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत बुधवारी निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या