18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रशुक्रवार सकाळी ११ पर्यंत लटकेंना राजीनामा स्विकारल्याची प्रत द्या : उच्च न्यायालय

शुक्रवार सकाळी ११ पर्यंत लटकेंना राजीनामा स्विकारल्याची प्रत द्या : उच्च न्यायालय

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती.

शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीने सुनावणी झाली. यावेळी ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा २ सप्टेंबर रोजी दिला. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. ३ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचे लटके यांच्या वकिलाने सांगितले.

अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आणि उद्याचाच दिवस आहे. आणि त्यावरून रंगलेल्या राजकारणामुळे उमेदवाराबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा नोकरीचा राजीनामा महापालिकेनं अद्याप मंजूर केला नसल्यानं त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान उच्च न्यायालयाने शुक्रवार दि. १४ ऑक्टोबर सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्किाकारण्याचे आदेश महापालिकेला दिल्याने लटके यांना दिलासा दिला आहे.

त्यावर कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एकीकडे लटकेंकडून उमेदवारीसाठी कोर्टकचेऱ्या सुरु असताना शिवसेनेनं आता अन्य पर्यायांची चाचपणी सुरु केली होती. त्यात लटकेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. याशिवाय लटके यांच्या मातोश्री आणि बंधुंच्या नावाचीही चर्चा होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या