25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home महाराष्ट्र तुमच्या हातात जे आहे ते द्या अन्यथा.. संभाजीराजेंची सरकारला चेतावणी

तुमच्या हातात जे आहे ते द्या अन्यथा.. संभाजीराजेंची सरकारला चेतावणी

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : 2014 नंतर ESBC आरक्षण आणि त्यानंतर SEBC आरक्षणांतर्गत अनेकांना नियुक्तीच्या अनेकांना ऑर्डर मिळाली पण कामावर घेतलं जातं नाही… अस असताना सरकार काय करताय.. तुमच्या हातात जे आहे ते आधी करा अशी अशी चेतावणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकार ला दिलीय. ते कोल्हापूरात मराठा अरक्षणसाठी आयोजित न्यायिक परिषदेत बोलत होते.

यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात ठराविक वकिलांवर भर देण्यात येऊ नये, मराठा वकिलांची फौज या लढ्यात असली पाहिजे, वकिलांनी यामध्ये पुढाकार घ्यावा,असे आवाहन करत मराठा समाजाला इडब्युएस मधून आरक्षण नको या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तसच इडब्युएस आरक्षणाचे समर्थन करणारे पुढे काही धोका झाल्यास जबाबदारी घेणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान ,इडब्युएस मधून धोका होणार नाही याची जबाबदारी समर्थन करणाऱ्यांनी घ्यावी अस सांगत अनेकांना नियुक्ती ऑर्डर मिळाली पण कामावर घेतलं जातं नाही… अस असताना सरकार काय करताय.. तुमच्या हातात जे आहे ते आदि करा अशी अशी चेतावणी देत राज्य सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून वर दबाव टाकलाच पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी केलाय.

मराठा आरक्षणासाठी आता आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. मागे काय झालं ते पाहायचं नाही, आता पुढे काय होणार ते पाहिलं पाहिजे. कायदेशीर लढाई लढणाऱ्यांना पाठिंबा कसा देता येईल ते पाहिले पाहिजे. इडब्लूएस स्वीकारून मराठा आरक्षणासाठी 42 जणांनी दिलेले बलिदान व्यर्थ घालावायच का? असा सवाल देखील संभाजीराजेंनी विचारलाय.

काँग्रेस सत्तेवर आल्यावर पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायदे रद्द करणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या