24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रधर्माची गोळी दिली की लोक झोपून राहतात

धर्माची गोळी दिली की लोक झोपून राहतात

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना विरोधकांकडून सतत लक्ष्य केले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रसचे नेते विरोधकांना प्रत्युत्तर देत टीकास्त्र सोडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्यावरील टीकेवरून भारतीय जनता पक्षावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. हल्ली शरद पवार यांना प्रत्येक मुद्द्यात ओढून ताणून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचे कारण म्हणजे धर्मांध शक्तींना रोखणारा शरद पवार हा एकच हिमालय आहे हे विरोधकांना माहीत आहे. महात्मा गांधी यांना ज्या प्रमाणे बदनाम केले गेले, तसाच प्रयत्न शरद पवार यांच्या बाबतीत होत आहे, असेही आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड कोल्हापूर दौ-यावर आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाराष्ट्रा वणवा पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांना गोळी देऊन झोपविले जात आहे, असा घणाघाती आरोपही आव्हाड यांनी केला आहे. शरद पवार यांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही आव्हाड यांनी विरोधकांना दिला आहे.

कोणी एकाने ठरवले म्हणून सरकार बनले नाही
हे सरकार बनवण्यासाठी शरद पवार यांचे योगदान आहे. कोणी एकाने ठरवले म्हणून हे सरकार बनलेले नाही. हे सरकार स्थापन करण्यासाठी इतरांनी मदत केलेली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडणारे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनाही सवाल केला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या कानात काय सांगितले हे काय माईकवर सांगायचे का?, असा प्रश्न त्यांनी विचारला.

या वेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याबाबतही भाष्य केले. एका निरपराध मुलाला डांबून ठेवणे ही सिस्टम चुकीची असल्याचे ते म्हणाले. बालमनावर काय परिणाम होत असेल याचाही सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. तो केवळ शाहरुख खानचा मुलगा आहे हे कारवाईचे कारण होऊ शकत नाही, असे म्हणत ईडीच्या कारवायांना आम्ही जास्त महत्व देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या