कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने म्हैस दूध प्रतिलिटर २ रुपये व गाय दूध १ रुपये खरेदी दरात वाढ केली आहे, तर फूल क्रीम दूध विक्री दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असून, १ ऑगस्टपासून नवा दर लागू केला जाणार आहे, अशी माहिती विश्वास पाटील यांनी दिली.