नवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे सोन्या आणि चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी सोन्याने आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. आज सोन्याचा भाव ५३ हजार ८४४ रुपये प्रती १० ग्रॅमवर गेला. हा सोन्याचा आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे. बाजार सुरू होताच सोन्याचे दर तेजीने वाढले.
त्याच बरोबर चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याज दराबाबत घेतलेल्या निर्णयानंतर सोने आणि चांदीचे भाव वाढले वाढलेत. सोने ५३ हजार ५०० च्या पुढे तर चांदीचा दर ६३ हजार ६०० च्या पुढे गेला आहे. डॉलर जसजसा कमकुवत होत चालला आहे, तस तसा सोने आणि चांदीच्या किमती आणखी वाढणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता बाजार सुरू होताच ५१२ रुपयांची तेजी आली.
Read More लातुरात पुनश्च लॉकडाऊन